तुळजापूर / प्रतिनिधी-

मराठवाडयात तिर्थक्षेञ तुळजापूरच्या इतिहासात  प्रथमच  आई तुळजभवानीच्या पुण्य पावन नगरीमध्ये  शिवजयंती निमित्ताने शिवबाराजे प्रतिष्ठान वतीनै  भव्य राज्यस्तरीय  बैलगाड्या छकड्यांच्या शर्यती शनिवार दिनांक 19 मार्च 2022 रोजी सकाळी 09 वा उस्मानाबाद रोडवरील महालक्ष्मी नगर जवळील शेतात रंगणार असल्याची माहीती अध्यक्ष सांळुके यांनी पञकार परिषदेत दिली.

या स्पर्धेविषयी माहीती सांगताना सांळुके पुढे म्हणाले की, राज्यातील सत्तर स्पर्धेकांनी आपली नावे आजपर्यत नोंदवली असुन यात फलटण, पंढरपूर, बार्शी,  आळंदी, माळशिरस,  सातारा सह मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्यातील शेतकरी सहभाग नोंदवत आहेत. या स्पर्धा सातारा पध्दतीने होणार  आहेत. या स्पर्धेसाठी पंच व समालोचक हे राज्यस्तरीय आहेत

या स्पर्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे  व नरेश पेंदे यांच्या शेतात होणार आहेत. या स्पर्धतील प्रथम पारितोषिक विजेत्यास आ. कैलास  पाटील, आमदार तथा जिल्हा प्रमुख शिवसेना उस्मानाबाद  यांच्या वतीने 51,000 / - व गदा, द्वितीय - विजेत्यास नगरसेवक युवानेते  रणजीत  इंगळे  यांच्या वतीने 31000 / - व गदा , तृतीय विजेत्यास  चिन्मय   मगर 21000 / - व गदा ., चतुर्थ विजेत्यास   किरण   लोंढे, श्री तुळजाभवानी पुजारी  यांच्या वतीने 11000 / - व गदा , शर्यतीचे मैदान व स्टेज नगरसेवक  श्रीकृष्ण  सूर्यवंशी   याची व्यवस्था करुन दिली आहे.  या वेळी विजय वाघमारे, सुमित छञे,  दिपक निकम, किरण लोंढे नितीन जट्टे आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.

 मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण सर्व नियम व अटींचे पालन करून बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्ण शर्यती शासनाने घालून दिलेल्या नियमांचे अटींचे पालन करावयाचे आहे.  शर्यत स्वतःच्या जबाबदारीवर पहावयाचे आहे .  दोन्ही गाड्या शर्यतीत समान उतरल्यास त्या गाड्यांना पुढे चाल देण्यात येईल व त्या समान गाड्यांच्या चाकोरी साठी चिठ्ठ्या टाकण्यात येतील ,  स्पर्धकांनी गाडी नोंद करण्यापूर्वी शर्यतीत सहभाग घेण्यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना भरून देणे बंधनकारक राहील व बैलाचे स्वास्थ आधी आरोग्य विषयी प्रमाणपत्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावे व आयोजकांकडे जमा करावे ,  पंचांचा निर्णय अंतिम राहील , सर्वांसमोर चिठ्या टाकून ल्याप्स पाढले जातील , चिठ्या गाडी मालकाकडून काढण्यात येतील .तरी इछुकांनी  आयोजक  अर्जुन  साळुंखे ,  विकी  वाघमारे चेतन,   नितीन जट्टे,   सुमित  छत्रे यांच्याकडे नावे नोंदवावेत, असे आवाहन शिवबाराजे प्रतिष्ठानने केले आहे


 
Top