तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरात शनिवारी पहाटे साडे बारा ते साडेतीन वाजेच्या दरम्यान शहराचा जुन्या  काही भागातील विद्युत पुरवठा अचानक पणे खंडित झाल्याने या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

शनिवार पहाटे १२.३० वा शुक्रवार पेठ सह अन्य भागातील वीज पुरवठा अचानक खंडीत झाला तो जवळपास एक तास खंडीत होता नंतर काही काळ वीज आली पुनश्च दोन वाजता पुरवठा खंडीत झाला अखेर पहाटे साडेतीन वाजता वीज आली या कालावधीत शुक्रवार पेठ, पावनारा गणपती,  दशवातार मठ सह जवळपास अर्ध्या शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.

सध्या शहरात मोठ्या प्रमाणात किरकोळ चोरीचा घटना घडत असल्याने वा यातच वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांनमध्ये भितीचे निर्माण झाले होते त्यातच  उकाडा  व  डासांचा वाढता प्रादुर्भाव व  लाईट बंद यामुळे नागरिकांचे विशेषता वृद्ध लहानमुळे आजारी व्यक्ती याचे मोठे हाल झाले.  राञी अपराञी विद्युत पुरवठा खंडीत होवू नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ञस्त शहरवासियांन मधुन केली जात आहे.


 
Top