उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील बोंबले मारुती चौक वासुदेव वस्ती येथील पालावरच्या शाळेत भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, सेवांकुर भारत व जिल्हा बोलरोग तज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बाल आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे उद्‌घाटक व प्रमुख अतिथी डॉ. दत्तात्रय खुने ज्येष्ठ बालरोग तज्ञ जिल्हा शासकीय रुग्णालय, डॉ. अभय शहापूरकर यांचे हस्ते संपन्न झाले. या वेळी इतर मान्यवर डॉ. मु ळे, डॉ प्रसाद धर्म, डॉ. सचिन रामढवे, डॉ. निखिल मुसळे डॉ. अजित बुरगुटे ,प्रा. श्यामराव दहिटणकर व रामदास अडसूळ उपस्थित होते .

प्रास्तातिक न मान्यवरांचे स्वागत डॉ अमर सातपुते यांनी शाल, श्रीफळ गुलाब पुष्प देऊन केले. प्रा. लक्ष्मण सुपनार यांनी पालावरच्या शाळेची संकल्पना व कार्यपध्दतीची माहिती सांगितली कार्यक्रमाचे उद्‌घाटक डॉ दत्तात्रय खुने यांनी आरोग्य शिबीराची नितांत गरज पालावरच्या विद्यार्थ्यांना आहे अशी मुले आरोग्य प्रवाहात येत आहेत याचे कौतुक केले. अशा कार्यक्रमास आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. डॉ. अभय शहापूरकर आपल्या मनोगतात म्हणाले  मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे ती कुपोषण मुक्त निरोगी व संस्कारीत झाली पाहिजेत  या शाळेतील व वस्तीवर  ७४ मुलांची आरोग्य तपासणी डॉ. अभय शहापूरकर, डॉ प्रसाद धर्म, डॉ सचिन रामढवे,डॉ निखिल मुसळे व दंतरोग तज्ञ डॉ अजित बुरकुटे यांनी केली गोफन औषध वितरणही केले. केमिस्ट चेतन भन्साळी यांनी सहकार्य केले.

बाल आरोग्य तपासणी शिबीरासाठी आयुर्वेदिक महाविद्यालयातील वीस विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. शिक्षिका सौ. अनुसया सातपुते, रामदास अडसूळ, प्रा. लक्ष्मण सूपनार, परमेश्वर सातपुते ,भारत सातपुते हृति क हुलवानकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम केले कार्यक्रमाचे नियोजन व सूत्र संचालन डॉ अमर सातपुते  यांनी केले. शहरातील पाच पालावरच्या शाळांचे पालक प्रा. शामराव दहिटणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.


 
Top