उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामदैवत श्री विष्णू-महादेव यात्रा महोत्सव आणि गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाची बैठक येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात उत्साहात पार पडली. या दोन्ही महोत्सवासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी यशवंत लोेंढे, उपाध्यक्षपदी शिवदास पाटील, सचिवपदी अप्पूराजे गवळी यांची एकमताने निवड करण्यात आली.

 जगद्गुरू तुकाराम महाराजांचे 9 वे वंशज श्रीगुरू सोपानकाका महाराज देहूकर यांच्या कृपाप्रसादाने, श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाने आणि श्रीगुरू कान्होबा महाराज देहूकर यांच्या उपस्थितीत गुढीपाडवा चैत्र शु. 2 , शनिवार, दि. 2 एप्रिल ते चैत्र शु. 7 शुक्रवार, दि. 8 एप्रिल 2022 पर्यंत यंदाचा भव्य सप्ताह सोहळा करण्याचे नियोजन या बैठकीत ठरले. सध्या तामलवाडी अन् पंचक्रोशीतला कोरोना बहुतांश ओसरला आहे, सुगी करून बळीराजाही थोडा सुखावला आहे.  यामुळे यंदाचे दोन्ही सांस्कृतिक कार्यक्रम नव्या उमेदीने करण्याचे धोरण ठरले आहे. या गावच्या हरिनाम सप्ताहाचे 48 वे वर्षे असून, गेल्या 2 वर्षात अत्यंत साधेपणाने येथे हा सप्ताह पार पडला. यामुळे यंदाच्या यात्रा अन् सप्ताहासाठी नागरिकांत उत्साही वातावरण दिसून आले. तर आगामी 2 वर्षात सुवर्णमहोत्सवी वर्षे येणार असून, त्यावर्षीही मोठे सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या सप्ताह सोहळ्यात पहाटे काकडा, गाथा भजन, प्रवचन, रात्रौ किर्तनसोहळा रंगणार आहे. दि. 8 एप्रिल रोजी श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकरांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

 या बैठकीस कृउबासचे संचालक यशवंत लोंढे, सोसायटी माजी चेअरमन शिवदास पाटील, माजी सरपंच दत्तात्रय वडणे, माजी पं. स. सदस्य गुंडाप्पा गायकवाड, ग्रा. पं. सदस्य सुधीर पाटील, हणुमंत गवळी, शिवाजी सावंत, नानासाहेब पाटील, शिवसेना नेते अप्पूराजे गवळी, सुधीर गायकवाड, सतीश माळी, सिध्देश्‍वर मसुते, सुधाकर लोंढे, भास्कर पाटील, देहूकरांचे पाईक भाऊसाहेब पाटील, बापूसाहेब पाटील, संतोष जगताप, अमोल घोटकर, ज्ञानेश्‍वर जगताप, विकास घोटकर, समाधान गायकवाड, रामदास गायकवाड, केशव गुरव, अनिल पाटील, विकास कांबळे, राम करंडे, विठ्ठल घोटकर, माजी सरपंच नाना माळी, गोरख माळी, माऊली घोटकर, शाहीर गायकवाड, तुकाराम गायकवाड, प्रभाकर लोंढे, मारूती पाटील, तुकाराम सुरवसे, जगन्नाथ गायकवाड, इंद्रजित घोटकर, आप्पा रणसुरे, अमोल घोटकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top