तुळजापूर / प्रतिनिधी

 भारतीय संस्कृती आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीचे स्थान अनन्यसाधारण आहे , जिथे स्त्री शक्तीचा सन्मान होतो तिथे समृद्धी आणि सौख्य नांदते अशा शब्दात निवृत्त उपप्राचार्य इंदुमती भोरे यांनी बारूळ येथील महिला मेळाव्यात मार्गदर्शन केले.

  यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये  २६ मार्च २२ दुपारी ४  वाजता महिला मेळावा संपन्न झाला. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील माजी उपप्राचार्य श्रीमती इंदुमती भोरे या उपस्थित होत्या ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुलभ कोरेकर या होत्या.  ‘ मुलगी जगवा मुलगी शिकवा’ या वेळी बोलताना निवृत्त उपप्राचार्य भोरे  म्हणाल्या की मुलगी वंश वेल वाढवते,त्याबरोबर ती कुटुंब संस्था टिकवून ठेवते कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे महिला शक्तीचा समाजाने सदैव आदर करावा .

 या कार्यक्रमात कु,श्रद्धा यादव,कु सोनाली,कु राजमाने,कु लोहार,कु शेळके,यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी विद्यार्थिनींनी स्त्री पुरुष समानता आणि आणि स्त्रिया मधील गुणवत्ता याविषयी आपली मनोगते व्यक्त केली.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कर्यक्रम अधिकारी डॉ शशिकला भालकरे,डॉ आशा बिडकर,प्रा उषा बदने,प्रयत्न केले सूत्र संचालन कु सोनाली राजमाने हिने केले. आभार डॉ सुलभा कोरेकर यांनी मानले.

 
Top