उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाच्या हितासाठी सैनिकाच्या कल्याणाकरिता आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व सैनिकावर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्याकरिता दिनांक 24 मार्च 2022 रोजी शासकीय विश्रामगृह पोलीस मुख्यालयासमोर उस्मानाबाद येथे सकाळी साडेअकरा वाजता माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत निवृत्त अध्यक्ष सैनिक फेडरेशन श्री नारायण अंकुशे कार्याध्यक्ष सैनिक ड्रेसर श्री निंबाळकर सचिव सैनिक अग्रेसर महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत उपस्थितीमध्ये सैनिक फेडरेशन जिल्हा शाखा उस्मानाबाद ची स्थापना करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणीत उस्मानाबाद जिल्हा सुभेदार बाळासाहेब जावळे जिल्हाध्यक्ष , सुभेदार लक्ष्मण इंगळे जिल्हा सचिव, सुभेदार मेजर अनरी कप्तान जगन्नाथ चव्हाण उपाध्यक्ष, हवलदार अशोक गाडेकर जिल्हा कार्याध्यक्ष, ग्रामीण हवालदार हरिदास तुळशीराम शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष, नायब सुभेदार त्रिंबक कोळगे जिल्हा संघटक, हवालदार तानाजी गव्हाणे जिल्हा संघटक , सुभेदार ऑर्नरी लेफ्टनंट पांडुरंग जगताप जिल्हा संघटक, नायक सय्यद परवेज रब्बानी जिल्हा संघटक, नायक रमेश चांगदेव शिंदे जिल्हा संघटक, नाईक रामभाऊ सिताराम मगर जिल्हा संघटक, नायक भीमा लुंगसे जिल्हा संघटक तसेच उस्मानाबाद तालुकाध्यक्ष सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट ज्ञानदेव दगडू गुंड,तुळजापूर तालुकाध्यक्षहवालदार दत्ता मधुकर नवगिरे , उमरगा तालुकाध्यक्ष नायब सुभेदार धर्मवीर नवनाथ बिराजदार,कळंब तालुकाध्यक्ष
हवालदार जनार्दन पाटोळे ,वाशी तालुकाध्यक्ष सुभेदार ऑर्डिनरी कॅप्टन विलास कवडे , भूम तालुकाध्यक्ष हवालदार उमेश महादेव मुलुक,परंडा तालुकाध्यक्ष हवालदार मधुकर नवनाथ बिडवे आदींच्या िनवडी घोषीत करण्यात आल्या आहेत.