खासदारांनी वाचाळ विरांना आवर घालावा-भाजप

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गेल्या कांही महिन्यापासून भाजप-शिवसेनेमध्ये रेल्वेच्या कामावरून पत्रकबाजी होत आहे. पर्वा भाजप जिल्हाध्यक्षांच्या नावाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांने पत्रक काढून घरगडी म्हटले, त्यानंतर भाजच्या वतीने पत्रक काढून शिवसेना खासदारांनी वाचाळ विरांना आवर घालावा, असे पत्रक काढले. त्यामुळे आगामी काळात भाजपा-शिवसेनेत पत्रक उध्द पेटल्याचे दिसून येणार आहे. 

 सोलापूर- तुळजापूर उस्मानाबाद रेल्वेमार्ग  केंद्र सरकारने मंजूर केला आहे ,त्यामुळे या कामाचे जे काही लहान मोठे  श्रेय आहे ते नागरिकांकडून भाजपच्या पारड्यात टाकल जात आहे...यामुळे व्यथित होउन सोमाणी या वाचाळ विराने आमचे नेते भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष   नितिन काळे  यांच्या बद्दल अपशब्द बोलताना दिसत आहे.  आपल्या खासदार ला खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी याच नेत्या ने अहोरात्र कष्ट केले आहे हे कार्यकर्त्यांनी व खासदार यांनी देखील विसरू नये आणि खासदार यांनी असल्या सोमाणी सारख्या वाचाळ वीरांना आवर घालावा ,   या असल्या वाचाळ वीरांच योग्य बंदोबस्त करेल, असा इशारा  भाजपाचे तालुका संघठन सरचिटणीस नामदेव   नायकल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 

विशेष म्हणजे केंद्र सरकार ने या रेल्वे मार्गासाठी केवळ ३२ कोटी रुपये दिल्याची टिका शिवसेना करते तर फडणवीस मुख्यमंत्री असताना या रेल्वे मार्गांचे काम केंद्र व राज्य सरकारच्या ५० -५० टक्के खर्चातून करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे भाजपवाले केंद्र सरकारने ३२ कोटी तर दिले राज्य सरकार ने काय केले. असा प्रश्न उपस्थित करत आहेत. एकंदर शिवसेना-भाजपाच्या राजकारणात जिल्हवाशिय मात्र सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गांपासून किती वर्ष वंचित राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 

 
Top