उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 डॉ. हेमंत मुरलीधर देशपांडे यांच्या देशपांडे किडनी केअर सेंटरचा उद्घाटन सोहळा रविवार (दि. 20) माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमास उस्मानाबाद शहर व सोलापूरचे नामांकित डॉक्टर उपस्थित होते. मुरलीधर देशपांडे, सौ. शामला देशपांडे, सौ. अंजली जोशी, अच्युत जोशी, डॉ. हेमंत मुरलीधर देशपांडे हे मूळ उस्मानाबादचे असून, त्यांनी औरंगाबाद व सोलापूर येथे किडनी तज्ज्ञ म्हणून नावलौकिक मिळविला आहे. उस्मानाबादेत या किडनी केअरच्या वतीने अत्याधुनिक थुलीयम लेझरद्वारे मुतखड्यावर शस्त्रक्रिया, लघवी संबंधी सर्व प्रकारच्या समस्यांचे निदान व उपचार, वारंवार लघवी येणे, बंद होणे, मुत्र मार्गावर इजा, जळजळ, रक्त येणे, सर्व प्रकारच्या मुतखड्यावरील शस्त्रक्रिया, प्रोस्टेस्ट ग्रंथीवर उपचार सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

शहरातील माणिक चौकात हे किडनी केअर सेंटर असून, उस्मानाबादकरांची सोय झाल्याबद्दल उपस्थितांनी देशपांडे यांचे आभार मानले. कार्यक्रमास डॉ. भारत माने, डॉ. गणेश पोलावार, डॉ. विजय रघुजी, डॉ. धनंजय पाटील, डॉ. अभय शहापूरकर, डॉ. कासेगावकर, डॉ. सुनिल मेहता, डॉ. रिजवान उलहक, डॉ. सचिन देशमुख, डॉ. अनंत राजमाने, डॉ. अनुपम शहा, एम. डी. देशमुख, जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्यासह मित्र परिवार व नागरिक उपस्थित होते. दौलत निपाणीकर यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. हेमंत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. 

 
Top