तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार समोर मोठ्या प्रमाणात असणारे किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही नगरपरिषदच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करत येथील अतिक्रमण हटविले आहे. त्यामुळे मार्गक्रमण करताना भाविकांना होणारा ञास दुर झाला आहे. 

शुक्रवार -शनिवारी- रविवार सलग तीन सुट्यांच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी दर्शनार्थ भाविक मोठ्या संखेने  येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजे शहाजी महाध्दार, राजमाता माँ जिजाऊ महाद्वारासमोर    किरकोळ विक्रेते ठाण मांडुन बसत असल्याने येथे भाविकांना मंदीरात जा ये करताना कसरत करावी लागत होती.  त्यातच बांगड्या विक्रेत्या महिला येथेच ठाण मांडुन व्यवसाय करीत असताना फुटलेल्या बांगड्याच्या काचा भाविकांच्या पायात घुसुन भाविक जखमी होत होते.  या पार्श्वभूमीवर भाविकांच्या तक्रारी लक्षात घेता नगरपरिषदच्या अतिक्रमण हटाव पथक प्रमुख दत्ता सांळुके यांनी महाद्वारासमोरील अतिक्रमण हटवले. यावेळी बांगड्या विक्रेत्या महिलांनी दांडगाई करीत अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावुन गेल्या होत्या अखेरस त्यांची दांडगाई मोडत त्यांना तेथुन हलवुन महाद्वारा समोरील परिसर अतिक्रमण मुक्त केल्याने भाविकांना मार्गक्रमण करताना दिलासा मिळत आहे. 

 
Top