उस्मानाबाद (प्रतिनिधी)

एस.बी.एन.एम.कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी   अध्यापक महाविद्यालयाच्या प्रा. सुकेशनी गव्हाणे-मातने ने मनोगत व्यक्त केले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.कैलास मोटे हे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून अध्यापक महाविद्यालयाच्या प्रा.श्रीमती सूकेशनी गव्हाणे-मातने या होत्या तर व्यासपीठावर फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरज ननवरे, कॉलेजच्या प्राध्यापिका श्रीमती उंबरे ए.बी.व केदार सर हे उपस्थित होते.दरम्यान  महिला दिनानिमित्त व्ही.पी.कॅम्पसमधील अध्यापक महाविद्यालय,पॉलिटेक्निक कॉलेज, कृषी महाविद्यालय,आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसी तसेच एस.बी.एन.एम.औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील सर्व  महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह भारतीय संविधान प्रत व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य कैलास मोटे केले . यावेळी श्रीमती उंबरे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.बी.एन.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य सुरज नन्नवरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षता खडके व कु.थोडसरे सृष्टी यांनी केले व आभार  प्रा.नागरगोजे आर.बी.यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी इतर कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले.


 
Top