उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन शुक्रवार दि.२५ मार्च २०२२ रोजी, शिराढोण ता.कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात शिराढोण व परिसरातील सर्व वयोगटातील ४२५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन पो.नि.वैभव नेटके व तेरणाचे विश्वस्त श्री.अशोक भाऊ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे पं.स.मा.सभापती दत्तात्रय साळुंके, किरण पाटील, ॲड.नितीन पाटील, विकास कोंडेकर, अशोक महाजन,प्रमोद तात्या पाटील तसेच आशा कार्यकत्या व अंगणवाडी कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. अतुल कुमार, डॉ. अंकीत कुरकूटे, डॉ.शंतनू कळंबे, डॉ. तुषार कांबळे, डॉ.लक्ष्मण इंगळे, डॉ. परवीन सय्यद यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, नामदेव शेळके, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे व प्रा.आ.शिराढोणचे डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी यांनी परीश्रम घेतले.


 
Top