उस्मानाबाद / प्रतिनिधी-
आज जगभरात भारत देशाचे नाव अभिमानाने सांगीतले जाते. याचे संपूर्ण क्षेय हे देशाचे कणखर पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनाच जाते. आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी उदयास आलेली आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज देश समक्षपणे आत्मनिर्भर होत असुन इतक्या मजबुतीने उभा होत आहे. जगाच्या पाठीवर असा एकही देश भारताकडे वाकडया नजरेने डोकाऊन पाहु शकत नाही.
नरेंद्र मोदी हे महिन्याच्या प्रत्येक २७ तारखेला देशातील नागरिकांना विकासात्मक योजना आणि आपण करत असलेल्या कामाची माहिती देत असतात. आजचा मन की बात हा ८७ वा कार्यक्रम होता. धाराशिव तालुक्यातील तेर येथे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह पदमाकर फंड, मंगेश फंड, नवनाथ नाईकवाडी व तेरच्या असंख्य ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.
सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या अजेंडयामुळे कित्येक होतकरु आणि बेरोजगार तरूण आज स्वत:चा व्यवसाय, व्यापार उभारु शकले. याचाच एक भाग सांजा रोड परिसरातील अक्षय भालेराव नामक युवकाने आत्मनिर्भर योजनेचा लाभ घेत स्वत:चे ई सेवा केंद्र उभारले आणि आज भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांना मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण त्यांच्या दुकानात पाहण्यासाठी आग्रह केला.
भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजसिंह राजेनिंबाळकर, ओम नाईकवाडी, पपिन भोसले, हिम्मत भोसले, गणेश एडके, प्रसाद मुंडे यांच्यासह असंख्य युवकांनी मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले.