उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरण काम करण्यासाठी २३ मार्च रोजी पार पडलेल्या तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे पूर्णाकृती पुतळ्यासह चौक सौंदर्यीकरणाचे काम लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत श्री क्षेत्र तुळजापूर मंदिर, मंदिर परिसर व शहर विकासाकरिता ३१५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये शहरातील मुख्य चौकांचे सुशोभीकरण करण्यासाठी रुपये २०० लक्ष निधीची तरतूद करण्यात आली होती. यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरण करण्यासाठी केलेली तरतूद पर्याप्त नसल्यामुळे व यात अनेक बाबी अंतर्भूत नसल्यामुळे या कामाचे रुपये ८७.३० लक्ष किमतीचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, सुधारित अंदाजपत्रकीय किंमत मूळ प्रशासकीय मान्यतेच्या ३० % पेक्षा जास्त असल्याने शासनाच्या मानवतेकरिता प्रधान सचिव नगर विकास विभाग यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. प्रस्तावास शासनाची मान्यता मिळवून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. शासनाकडून मान्यता प्राप्त होताच प्राधिकरणाच्या बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरण कामास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या कामास लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत पाटील यांनी दिले. 

 
Top