उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कळंब शहरातील सर्व मालमत्ताधारक आणि पाणीपट्टी धारक यांनी मार्च 2022 पर्यंत मालमत्ताकर आणि पाणीपट्टीची थकबाकी भरून घ्यावी.अन्यथा एप्रिल 2022 पासून मालमत्ताकर आणि पाणीपट्टी यांच्या थकबाकीवर 2 % व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे.
तरी मालमत्ताकर आणि पाणीपट्टी धारक यांनी तात्काळ कराचा भरणा करून नगर परिषदेस सहकार्य करावे,असे आवाहन कळंब नगर परिषदेचे प्रशासक आणि उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.