उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन बुधवार दि.०२ मार्च २०२२ रोजी, नागुलगाव ता.कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात नागुलगाव व परिसरातील सर्व वयोगटातील ३५० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन दत्तात्रय साळुंके (माजी सभापती पं.स.कळंब) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे ओव्हाळ सर (जि.प.प्रा.शा.मुख्याध्यप नागुलगाव), कलमाकर भोरे, रामलिंग खाडे, अमरसिंह भोरे, बाळासाहेब भोरे, शाहु भोरे, बापू महाजन, आशा कार्यकर्त्या देवशाला माने, आंवडीका, केवळबाई धावारे, वंदना भोरे, व समस्त गाकवरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. दिपक बाराते, डॉ.परवीन सय्यद, डॉ.अपुर्व दुबे, डॉ.सोहम रुपारेल, डॉ.रोहीत दामोदर, डॉ.शाहन शेख, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, नामदेव शेळके, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना  शिंदे ईत्यादींनी परीश्रम घेतले.

 
Top