उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बु़)येथे भव्य सभामंडप (सभागृह) कामाचा शुभारंभ मंगळवार, महाशिवरात्रीदिनी (दि़१) आ़ कैलास घाडगे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती़

उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथील श्री हनुमान मंदिर, श्री विठ्ठल -रखुमाई मंदिर व श्री ज्योतीबा देवाच्या मंदिर समोरील जागेमध्ये भव्य सभामंडप उभारण्यात येत आहे़ राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून २५-१५ योजनेंतर्गत या कामासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे़ तब्बल ४० फूट लांबी, ३० फूट रुंदी तर १८ फूट उंची असलेले जिल्ह्यातील सर्वात मोठे अर्थात भव्य-दिव्य सभागृह उभारण्यात येत आहे़ महाशिवरात्रीनिमित्त यावर्षीही सारोळा येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़ सप्ताह सोहळ्याच्या मंगळवारी (दि़१) सहाव्या दिवशी महाशिवरात्रीदिनी या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते धैर्यशील पाटील व जीवन चंदने यांच्या हस्ते तर कामाचा शुभारंभ आ़पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, माजी पं़स़सदस्य सुरेश देवगिरे, सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब रणदिवे, माजी चेअरमन अ‍ॅड़ निवृत्ती कुदळे, हभप रावसाहेब मसे, सोसायटीचे संचालक अरूण मसे, प्रा़ सोपान कोल्हे, हभप पांडूरंग गुरव, शंकर इसाके यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले़ भूमिपूजन पूजेचे पौराहित्य मन्मथ स्वामी यांनी केले़ यावेळी सोसायटीचे संचालक अनिल चंदने, वैभव पाटील, महादेव साठे, सुधाकर मसे, सुधाकर देवगीरे, दौलत पाटील, विकास बाकले, ग्रापं सदस्य नितीन पाटील, नामदेव खरे, पप्पू रणदिवे, सावन देवगीरे, सतीश इसाके आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते़

 
Top