लोहारा/प्रतिनिधी

कृषी विभागाच्या वतीने महिला दिनानिमित्त आष्टा कासार येथे   सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत महिलांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. 

या कार्यशाळेत आत्मनिर्भर अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) राज्यात 2020 - 2021 पासून राबविण्यात येत आहे. ही योजना आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कडधान्य, दाळवर्गीय पिकावर राबविण्यात येत आहे. या योजनेचे सारांश कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी केले. ही योजना 35% अनुदानावर राबवण्यात येत आहे‌. तसेच या योजनेचे बँकेसोबत लिंक असल्याने लाभार्थ्याला उद्योग उभारण्यासाठी कर्ज भेटू शकते. लाभार्थ्यांना दाळ मिल, पापड उद्योग पॅकिंग मशिन, मार्केटिंग विविध बाबीसाठी शासनाकडून अनुदान मिळते, अशा विविध योजनेचे सविस्तर मार्गदर्शन कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी केले. यावेळी गावातील महिला शेतकरी श्रीमती केराबाई नागनाथ गायकवाड, विजय कुमार टिकंबरे, दयानंद टिकंबरे, कृषी मित्र अमोल बलसुरे, महिला बचत गट शेतकरी गट व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार श्रीमती केराबाई नागनाथ गायकवाड यांनी मानले.


 
Top