उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी होणाऱ्या तीसऱ्या  अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिले अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे  राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांनी दिली आहे.

या अगोदर ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे,श्रीराम पचिंद्रे यांनी संमेलनाध्यक्षपद भूषिवले आहे. उद्घाटन सोहळा,परिसंवाद,कविसंमेलन, कथाकथन,असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे. तीसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस हे चिकित्सक लेखक,अभ्यासक,संशोधक म्हणून ख्यातकिर्त आहेत. त्यांनी  एकूण 83 ग्रंथाचे विपुल लेखन त्यांनी  केले आहे, पिंपरी येथे संपन्न झालेल्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषिवले आहे. 


 
Top