उस्मानाबाद / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष म्हणून काम करत असलेल्या मनिषाताई राखुंडे-पाटील यांची उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी महिला  जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र त्यांना पुणे येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये त्यांची नियुक्ती ही प्रभारी म्हणून करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 त्यांनी यापूर्वी यशस्विनी अभियानच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयक म्हणून काम केले आहे.तसेच त्या उस्मानाबाद महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या  कार्याध्यक्ष  म्हणून न ही काम पाहत होत्या. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काही दिवसापूर्वी मजबूत मानला जात होता मात्र उस्मानाबाद मधील काही स्थानिक मातब्बर नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उस्मानाबाद   जिल्हयात महिलांचे संघटन वाढावे या हेतूने बचत गटाच्या माध्यमातून अनेक दिवसापासून कार्यरत असणाऱ्या मनिषा ताई पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे संघटन मजबूत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

निवडीबद्दल जेष्ठ नेते जिवनराव गोरे ,वैशालीताई मोटे,प्रज्ञाताई खोसरे,निरीक्षक, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,अमित शिंदे,सुरेश पाटील,संजय पाटील दुधगावकर,महादेव माळी, कुणाल निंबाळकर,शहराध्यक्ष आयाज शेख,कार्याध्यक्ष- सचिन तावडे,लतीफ पटेल,राॅबीन बगाडे यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top