उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील जिल्हा परिषदेच्या प्रशासक पदाचा कार्यभार आज जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वीकारला . यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजळ शिंदे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन ) डॉ . नितीन दातार , उपमुख्य कार्यकरी अधिकारी (स्वछता व पाणी पुरवठा) आनंत कुंभार ,जि प चे कॅफो सुरेश केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थंकर आदी उपस्थित होते .


 
Top