उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या जन्म दिनानिमित्त गुरूवारी (दि.२४) उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बु.) येथे विविध विकास कामांचे लोकार्पण, कीर्तन, भजन, अभिष्टचिंतनसह विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पत्रकार श्री. रणदिवे यांच्या हस्ते त्यांच्या जन्मगावी सारोळा (बुद्रुक ) येथे गुरुवारी स. ७ वा. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी अंबाबाई देवीचे पादुका पूजन, भगवान शिवशंकर श्री महादेवांच्या मंदिरात महाभिषेक -महापूजा तर  स. ८ वा. सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. स. ९ वा. रक्तदान शिबीर उद्घाटन व  स. ९.३० वा. ग्रामदैवत बालपीर साहेब दर्गाहवर फुल- चादर अर्पण कार्यक्रम होणार आहे. सायं. ६ वा. भजन महोत्सव तर सायं. ७ वा. श्री. रणदिवे यांचा अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.  रा. ९ वा. हभप नवनाथ महाराज चिखलीकर यांची अमृत कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. स. ११ ते रा. १ वाजेपर्यंत महाप्रसाद सेवा होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पैठण पीठाचे पीठाचार्य तथा अखिल भारतीय वारकरी संप्रदाय परिषदेचे अध्यक्ष हभप प्रकाश बोधले महाराज  तर  हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज सूर्यवंशी, हभप रघुनंदन पुजारी महाराज, हभप राम पांचाळ महाराज, हभप योगेश बप्पा इंगळे महाराज, हभप राजाभाऊ देवगिरी महाराज, हभप बबन मिटकरी महाराज, हभप श्रीधर बारखडे महाराज, हभप काका उंबरे महाराज, हभप नवनाथ शिरसाट, महाराज, हभप वामन महाराज शेळके, हभप महादेव महाराज कासार, संगीत विशारद दीपक लिंगे , मृदंगाचार्य तात्या टिंगरे महाराज यांची उपस्थिती राहणार आहे.  यावेळी सारोळा येथे ३० लक्ष रुपयाचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या २४ हायमस्ट लॅम्प व २० लक्ष रुपयाच्या पेवर ब्लॉक रस्ता कामाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. १० लक्ष रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता व नाली कामाचा शुभारंभही यावेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या सर्व कार्यक्रमास भाविक -भक्तासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठान,  धनंजय रणदिवे मित्रमंडळ, राजेछत्रपती गणेश मंडळ व सारोळा ग्रामस्थांनी केले आहे.


 
Top