शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात मागील दोन वर्षापासुन मोठ्याप्रमाणात काटेरी झुडपांचा,झाडांचा वेढा पडुन पर्यटनासाठीचे सर्वच रस्ते बंदआवस्थेत होते.या किल्ल्यात दुर्गप्रेमी सह्याद्री प्रतिष्ठान ग्रुपच्यावतीने रविवार ता.६ रोजी वाढलेली काटेरी झाडेझुडपे,पथरस्त्यावरील गाजर गवताने व्यापलेला परिसरात मोठे परिश्रम घेत स्वच्छता मोहिम राबवुन रस्ते मोकळे करीत गडसंवर्धनाचा संदेश दिला.या मोहिमेत एकुण ६५ दुर्गप्रेमी बहाद्दर तरुणांचा मोठा सहभाग होता.यामोहिमेत कांही स्थानिक दुर्गप्रेमी युवक सहभागी होते.
मध्ययुगीन स्यापत्यशास्ञाचा उत्कृष्ट नमुना म्हणुन परंडा भुईकोट किल्ल्याची सर्वदुर मोठी ओळख आहे.आजही या किल्ल्यात मौल्यवान पंचधातु व इतर मोठ्या आकाराच्या लोखंडी तोफा असुन,२६ बुरुजांनी भक्कम तटबंदी असलेल्या या किल्ल्यात अनेक प्राचीन अवशेष पाहण्यास मिळतात.कोरानाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आजमितीस येणाऱ्या पर्यटकांना किल्लाबंदीचा आदेश कायम आहे.हे बंद दरवाजे कधी उघडणार याची प्रतिक्षा इतिहासप्रेमी,पर्यटकांना लागुन आहे.मागील दोन वर्षापासुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुईकोट परंडा किल्ला बंदअवस्थेत पडुन होता.आतील सर्व भागात प्रचंड मोठ्याप्रमाणात काटेरी झाडेझुडपे,मोठमोठ्या शेवरा झाडांनी किल्ला झाकाळुन गेला आहे.आलेल्या एकाही पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी वाट,मार्गच नसल्याने आतील किल्ला भागात कुठेच फिरता येत नव्हते.एकुण २६ बुरुजावरही गवताने,काटेरी झुडपाने मौल्यवान तोफा बुजुन गेल्या आहेत. मुख्य बुरुज वजा सर्वच बुरुजावर,पथरस्त्यावर प्रचंड दाट काटेरी झाडेझुडपे,मोठमोठे गाजर गवत वाढलेले आहे.पर्यटकांना ही झाडेझुडपे काढल्याशिवाय संपुर्ण किल्ला पाहता येणार नाही अशी दुरावस्था झालेली आहे.माञ,सोलापूर,बार्शी,उस्मानाबाद सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गप्रेमींनी राज्य पुरातत्व विभागाची लेखी परवानगी घेऊन ता.२७ फेब्रुवारी व ता.६ मार्च रविवार रोजी सलग दोन वेळेस भुईकोट किल्ला स्वच्छता मोहीम राबवुन अथक परिश्रमातुन पर्यटकांसाठीचे रस्ते,पथरस्ते चकाचक करुन मोकळे केले आहेत.एकुण ५ बुरुजावरील तोफेच्या आजुबाजुचा काटेरी झाडांचा,गवताचा विळखा काढुन सुस्थितीत तोफा ठेवल्या आहेत.प्रत्यक्षदर्शी पाहिले असता अतिशय कठिण ठिकाणी जात जीवाची पर्वा न करता काटेरी झुडपे हटविली आहेत.जे काम पुरातत्व विभागाकडुन होणे अशक्य आहे.ते काम या सह्याद्री प्रतिष्ठानच्या बहाद्दर दुर्गप्रेमीनी केले आहे.या स्वच्छता मोहिमेत छञपती शिवराय,हर हर महादेव नामाचा गजर करीत परिश्रम करण्यासाठी युवकात मोठी उर्जा निर्माण करीत होती. या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठाणचे एकुण ५० व परंडा शहरातील या प्रतिष्ठान सलंग्न १५ जण आशा एकुण ६५ जणांनी रविवारी सकाळी ८ वाजल्यापासुन मोठे परिश्रम घेत आतील किल्लाभागातील स्वच्छता मोहिम दिवसभर राबविली.याबद्दल ऐतिहासिक भुईकोट किल्ला तील असलेल्या शिवमंदीरच्या शिवसेवा समितीच्यावतीने सह्याद्री प्रतिष्ठाणच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या सह्याद्री प्रतिष्ठान ग्रुपच्यावतीने राज्यातील इतर गटकोट,भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहिम हाती घेवुन राबविली आह. आहे.या परंडा भुईकोट स्वच्छता मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठान ग्रुपचे सोलापूर जिल्हा प्रशासक अविनाश पोकळे,सहप्रशासक अक्षय जाधव,उस्मानाबाद जिल्हा प्रशासक सतिश गायकवाड,गणेश रावळ,सतीश लोखंडे,संदीप मोरे,सुरेश सातपुते,दत्ता भोगे,नवनाथ सातपुते,परंडा शहरातील रणजीत शिःदे,ऋषी विटकर,समाधान कोळेकर आदिसह एकुण ६५ दुर्गप्रेमी तरुणांनी किल्ला स्वच्छतेसाठी सहभाग घेतला होता.