उस्मानाबाद(प्रतिनिधी)

  गेल्या तीन वर्षापासून कोरोनामुळे शाळा नीट चालल्या नाहीत. जवळपास मुलांचे शिक्षण थांबले आहे. ऑनलाईन शिकणारांची संख्या कमीच आहे. पोषण आहाराचे तांदुळ विद्यार्थ्यांना घरी दिले जाते. आता शाळा सुरु झाल्या आहेत. परंतू आणखीही मध्यान्ह भोजन शाळेत दिले जात नाही. त्यामुळे विदयार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे मध्यानह भोजनावरील सरकारी खर्च वाढविण्याची मागणी राष्ट्र सेवा दलाच्या   वतीने उस्मानाबाद तहसीलदार यांच्या मार्फत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली आहे. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात आपण मध्यान्ह भोजनाचा खर्च गेल्या तीन वर्षाच्या १२ हजार करोड वरून १० हजारावर आणला आहे. हे सध्या महागाईमुळे गणित कसे जमणार?  त्यामुळे मध्यान्ह भोजन रितसर व पुरक मिळण्यासाठी त्याची तरतुद अंदाजपत्रकात दुप्पट करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर बालाजी तांबे, महेश लोमटे, दत्तात्रय खोबरे, सुरेश चौधरी, विजय गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top