तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील आरळी बु येथे मागील 5 वर्षी पासून दिला जाणारा हिरकणी पुरस्कार आपल्या जिल्ह्याची उंची वाढवणाराच आहे, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना एकत्र एका व्यासपीठावर आणत गावखेड्यातून सन्मानित करण्याची ही संकल्पना खूपच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे,सामाजिक भान ठेवत दिला जाणारा हिरकणी पुरस्कार महिलांना ऊर्जा देणारा ठरेल, असे  प्रतिपादन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले.

 आरळी बु महोत्सव समिती व स्वामी नरेंद्रचार्यसेवा समितीच्या वतीने जिल्हा व राज्यातील हिरकणी पुरस्काराचे वितरण महिला दिनाचे औचित्य साधून दि.7 मार्च रोजी आरळी बु येथे करण्यात आले, यावेळी सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा जिनत सय्यद,माजी सभापती शिवाजी गायकवाड, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, रोटरी क्लब अध्यक्ष रामचंद्र गिड्डे,सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस प्रवीण रणबागुल, जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,गौरीशंकर कोडगीरे,सुनील जाधव,शाम पवार,सुधीर कदम,चेतन बंडगर, सरपंच गोविंद पारवे,अमोल गवळी,सौदागर जाधव, दादाराव पारवे,आरळी बु महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पारवे आदींची उपस्थिती होती.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धैर्यशील नारायणकर,भीमराव पारवे,एकनाथ कोळी,सुधाकर पौळ,विकास जोत,संजय पारवे,अनिल आगलावे आदींनी परिश्रम घेतले.

 
Top