उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलचे अध्यक्ष पदी मराठवाड्याचे सुपुत्र ऍड वसंतराव साळुंके निवड झाल्याबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट व कारखान्याचे अध्यक्ष अरविंद दादा गोरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष हनुमंत भुसारे संचालक फत्तेसिंह देशमुख, ऍड निलेश बारखेडे, पाटील दिलीप गणेश तसेच मल्टीस्टेट चे उपाध्यक्ष ऍड चित्राव गोरे संचालक लईक शेख, शिवदास कांबळे, दिलीप पाठक नारीकर, सदाशिव कोळगे, बाळासाहेब मैरान पुष्पकांत माळाळे  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. निलेश बारखडे पाटील व पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार हनुमंत भुसारे यांनी मानले.

 
Top