तुळजापूर/ प्रतिनिधी- तिर्थक्षेञ तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळदुर्ग येथील हेडवर्क केंद्राचा वीजपुरवठा थकबाकी पार्श्वभूमीवर महावितरण ने खंडीत केल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहराला होणारा पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प झाला होता .शनिवार पाणीपुरवठा सुरुळीत करण्यात आला.
तुळजापूर नगरपरिषद ची पाणीपुरवठा चालु थकबाकी १,६७,११८रुपये आहे. मुळ थकबाकी ७०,३२,८६८रुपये असुन एकुण थकबाकी ८०,२७,९३१रुपये इतकी आहे. महावितरणने पाणीपुरवठा थकबाकी पोटी नळदुर्ग येथील हेडवर्कची वीज कनेक्शन कट केल्याने शहराला दोन दिवस पाणीपुरवठा करता येवु शकला नाही. पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागले होते.
तुळजापूर नगरपरिषदवर महावितरणची मोठी थकबाकी असल्याने सातत्याने वीज कनेक्शन कट करणे पैसे भरले कि जोडणे असा खेळ चालु असता यात नागरिकांना माञ नाहक पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.नगरपरिषद महावितरण थकबाकी कोट्यावधी रुपयाचा घरात कशी गेली याची चौकशी होने गरजेचे बनले आहे.