उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने क्रिकेट स्पर्धांना 11 मार्च रोजी उद्घाटन होऊन प्रारंभ झाला आहे.   जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी.वाय.जाधव,सचिव भाऊसाहेब गाडे, कोषाध्यक्ष दत्तात्रय बुकन, आणि उपाध्यक्ष निलेश नायगावकर, आरोग्य कर्मचारी संघटनेचे शरद मुंडे, मिलिंद प्रयाग,सचिन देवगिरे यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया लगत असलेल्या मैदानात स्पर्धेचे उद्घाटन झाले.

या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्मचारी यांचे एकूण दहा संघ सहभागी झालेले आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्व सुविधा संघटनेच्या वतीने अत्यावश्यक असणाऱ्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

      12 मार्च रोजी अंतिम स्पर्धा आहे. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रथम द्वितीय आणि तृतीय संघांना पारितोषिकाचे वितरण केले जाणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.


 
Top