उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील ताकविकी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ ताकविकी ग्रामस्थांच्यावतीने कारवाई साठी बेंबळी पोलीस स्टेशन येथे अर्ज / तक्रार नोंदवली आहे. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे , संमाज समाजकंटकांवरकडक कारवाई करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. तसेच कारवाई न  झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 निवेदनात घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती व बेबंळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हाची प्रत जोडून जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना  निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर मुस्लिम व ग्रामस्थांच्या सह्या आहेत या अगोदरही समाजकंटकांनी तीन वेळा गावातील मज्जिद चे नुकसान केले आहे गावातील नागरिकांना धमकावत आहेत या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी व न्याय द्यावा यापुढे कोणत्याही प्रकारची हानी झाली तर शासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.


 
Top