तुळजापूर / प्रतिनिधी-

गुटखा बनवण्याचे पावडर विक्रीसाठी परराज्यात घेऊन जाणाऱ्या ट्रकसह एकूण एक कोटी सहा लाख २३ हजार रुपये मुद्देमाल घेऊन जाणारा ट्रक तुळजापूर पोलिसांनी रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पकडला.

कर्नाटक येथून सुगंधी सुपारी व गुटखा बनवण्याचे पावडर विक्रीसाठी परराज्यात घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून (क्रमांक के. ए. ३२, सी. ३७३१) तुळजापूर मार्गे परराज्यात सुगंधी सुपारी ५५ किलोची २९८ पोती, किमंत ८१ लाख ९५ हजार, गुटखा बनवण्याची पावडर ४० किलोची पांढरी पोती ११९, १४ लाख २८ हजार रूपये असे एकूण ९६ लाख २३ हजार रूपयांचा मुद्देमाल तर एक ट्रक अंदाजे किंमत १० लाख रूपयांचा, असा मुद्देमाल तुळजापूर पोलिसांनी पकडला. या प्रकरणी अन्न व प्रशासन अधिकारी प्रमोदकुमार काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचा चालक भीमशहा गुरुशांतअप्पा घोगी (२६ वर्षे, रा. निंगडाली ता. बसवकल्याण) व किनर महमंद अलताफा बाबुमिया (३८ वर्षे रा. दुंबलगुंडी ता. हुमनाबाद. जि. बिदर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.


 
Top