उस्मानाबाद   / प्रतिनिधी :-

 उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे आिण उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे यांचा सोमवार दि. २१ फेब्रुवारीला भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सत्कार समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष धनंजय शंगाडे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश बोधले महाराज यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती असणार आहे. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे यांनी सहकार क्षेत्रात उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने जिल्हयाचा लौकीक वाढवला आहे. त्याचप्रमाणे जिल्हयात वारकरी संप्रदायची चळवळ ही नागदे यांनी चालवली आहे.त्यामुळेच त्याचंा नागरी सत्कार करण्याचेआयोजन करण्यात आले आहे.

उस्मानाबाद जनता बैंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्यािनमित्ताने नाईकवाडी नगर परिसरातील परिमल मंगल कार्यालयात दुपारी १ वाजता सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नागरी सत्कार समितीच्या वतीने जनता बँकेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब उंबरे, माजी नगराध्यक्ष जयंतपाटील, माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ बागल, बारा बलुतेदार महासंघाचे डी.एन.कोळी, नाभिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने, संपादक संतोष हंबरे, युवा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुनील शेरखाने, युवा नेते तुषार निंबाळकर, माजी नगरसेवक कल्याण पवार, समाजसेवक मुक्तार हुसेनी, पत संस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अमर माळी, समाजसेवक नंदकुमार शेटे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष पवार, ज्येष्ठ पत्रकार गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मुबािरश सिद्दीकी यांच्यासह संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे. 

 
Top