उस्मानाबाद   / प्रतिनिधी :-

 शहरातील शिवशंभूपंढरी नगरात हौशी छंदी गायक मेलडी स्टार समुहाच्या वतीने संगीतकार गायक बप्पी लहरी यांना त्यांच्या वेगळ्या दाहटनीच्या गीतांचे गायन करुन  श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी समुह प्रवर्तक युवराज नळे समन्वयक शेषनाथ वाघ , मल्हारी माने , विधिज्ञ दिपक पाटील मेंढेकर , रवींद्र कुलकर्णी , शरद वडगावकर, धनंजय कुलकर्णी, श्यामसुंदर भन्साळी,अर्चना अंबुरे, कु.क्षितीजा निंबाळकर, विजय यादव , कु . संस्कृती अंबुरे,नितीन बनसोडे , तौफीक शेख , अक्षय भन्साळी ,ज्ञानराज निंबाळकर, मुनीर शेख उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सुदर्शना वाघ , सार्थकी, सत्यहरी वाघ यांनी परिश्रम घेतले . प्रति वर्षा प्रमाणे मेलडी स्टार समुहाचा ‘ साल नया गीत पुराणे ‘ गीत गायनाचा कार्यक्रम रविवार २० फेब्रुवारी २०२२ यशवंतराव चव्हाण सभागृह जि.प . उस्मानाबाद सांय ६ वा असुन रसिकांनी मैफीलीचा लाभ घ्यावा असे आवाहन मेलडी स्टार समुहाच्या वतीने करण्यात आले आहे .

 
Top