तुळजापूर  / प्रतिनिधी :-

 तालुक्यातील हगलूर तांडा येथे डांबरीकरण कामाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य यांच्या फंडातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामासाठी 14 लाख रुपये निधी मंजूर करून प्रकाश चव्हाण यांनी हगलूर तांड्याकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाचे आश्वासन  पुर्ण केल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी नितीन पाटील,हरिष जाधव, माजी सरपंच अंकुश घुगे, माजी सरपंच नालंदा पाटील, माजी उपसरपंच संजय पवार ,माजी प.स.सदस्य दता मस्के,धिमाजी घुगे,सतिश दराडे, लक्ष्मण चव्हाण,रवि राठोड, देवजी पवार, अनिल पवार, सुनील पवार, राजेंद्र चव्हाण,प्रेमदास नाईक, शंकर कारभारी, राजपाल पवार, भिलू राठोड,राम पवार, लक्ष्मण राठोड, रोहित राठोड, धनाजी चव्हाण, बालाजी राठोड, सुनील राठोड, सुभाष राठोड, ग्रामसेवक अरुणा कदम उपस्थित होते.

 
Top