उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रतिबंध आणि नियंत्रणाच्यासाठी निर्माण केलेल्या उपचाऱ्याच्या खाटांची दैनंदिन माहिती दररोज विभागीय आयुक्त कार्यालयास देण्यासाठी आणि दररोज सीसीएमएस पोर्टलवर ही माहिती अपलोड करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती शुभांगी आंधळे (मो.9096038934) आणि निवासी वैद्यकीय अधिकारी सचिन बोडके (मो.9405236480) यांची नियुक्ती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज केली आहे.

नियुक्त समन्वय अधिकारी यांनी कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या (साध्या,ऑक्सिजनशिवाय खाटा, ऑक्सिजनसह खाटा, व्हेंन्टीलेटरसह आयसीयु खाटा, व्हेंन्टीलेटर व्यतिरिक्त आयसीयु खाटा, लहान मुलांसाठीच्या खाटा, नवजात शिशुसाठी खाटा आदी ) खाटांचे नियोजन करुन आवश्यक संख्येमध्ये खाटा उपलब्ध होत असतील आणि खाटांकरिता ऑक्सिजन तसेच व्हेंटीलेटरची देखील आवश्यक प्रमाणात उपलब्धता असेल याची दक्षता घ्यावयाची आहे. व्हेंटीलेटर हे सुव्यवस्थित असल्याची खात्री करावयाची आहे. केंद्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार केवळ डीसीएच मधील आयसीयुमध्ये व्हेंटीलेटर बसवायचे आहेत. या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावयाची आहे. तसेच DCHC चे रुपांतर DCH मध्ये करण्याबाबत तसेच DCCC मध्ये DCHC साठी आवश्यक निकषांची पूर्तता होत असल्यास त्याचे रुपांतर DCHC मध्ये करण्याबाबतचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास सादर करावयाचा आहे.

जिल्ह्यातील कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने खाटांबाबत दैनंदिन माहिती (शासकीय/सार्वजनिक सुट्टीसह) औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करणे, तसेच CCMS पोर्टलवर दररोज अपलोड करणे. तसेच ही माहिती उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) आणि उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मध्यम प्रकल्प क्र.दोन यांनाही कळविणे आवश्यक आहे.

 
Top