उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पिरामल स्वास्थ्य व इंडसइंड बँक लि. या संस्थेंच्यावतीने कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या रथास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी हिरवी झेंडी दाखवून या अभियानाचा आज शुभारंभ केला.

या जनजागृती  रथामार्फत उस्मानाबाद जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाची जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानाला उद्देशून श्रीमती कांबळे यांनी सांगितले की, 15 ते 18 वयोगटातील शाळा आणि शाळा बाह्य मुले तसेच दोन डोस बाकी आहेत, अशा सर्व लोकांना लस देण्यापर्यंत या कामासाठी आमचे स्थानिक पदाधिकारी सहकार्य करतील. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, श्री.दिगंबर गांधले, श्री.नागेश पडघन (फेलो), समस्त पिरामल आदी उपस्थित होते.


 
Top