उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद  येथे राष्ट्रसंत  संत गाडगे बाबा महाराज यांचा दशसूत्री संदेश शीला उभारणी व चौकाचे सुशोभिकरण करून 146 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन नगर परिषदेचे सीईओ श्री येलगटे यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी नगर परिषदेचे शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव, शहरप्रमुख पप्पु मुंडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन शेरखाने, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ पवार, परीट धोबी महासंघाचे राज्य संघटक प्रमोद चव्हाण, महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयराम चव्हाण, उत्सव समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे, बाळासाहेब राऊत, नेताजी धोंगडे,  महिला अध्यक्षा सुरेखाताई काशीद, प्रशांत वाघमारे ,दीपक चव्हाण, वसंत राऊत,अमोल सरफाळे, शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे,आकाश वाघमारे, लिबंराज डुकरे यांच्यासह शहरातील विविध घटकातील समाजातील सर्व मान्यवर उपस्थित होते

 
Top