उस्मानाबाद / प्रतिनिधी-

थोर समाजसुधारक, अंधश्रद्धेला लाथाडणारे समाज प्रबोधनकार संत गाडगेबाबा यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

संत गाडगेबाबा चौकात संत गाडगेबाबा यांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या  संगमरवर फरशीवर कोरलेल्या दहा वचनी समाज प्रबोधनाच्या किर्तनातील मौल्यवान विचार कोनशिलाचे लोकार्पण नगर परिषद मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे व नगरसेवक सोमनाथ गुरव यांच्या प्रयत्नातुन यांची उभारणी झाली.कार्यक्रमास प्रामुख्याने पञकार चंद्रसेन देशमुख,पत्रकार सयाजी शेळके,नगरसेवक युवराज बप्पा नळे,नगरसेवक राणा बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते नाना घाडगे,धोंगडे आबा,सुरेखा ताई काशिद, राजेंद्र धावारे,फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे, गुणवंत सोनवणे,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,संग्राम बनसोडे, स्वराज जानराव,विजय बनसोडे,नामदेव वाघमारे,अन्य इतर मान्यवर उपस्थित होते.

 
Top