उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पैसा आणि प्रॉपर्टीच्या   हव्यासात अनेकदा बनावट कागदपत्र बनवल्याचे   आपण अनेक पाहिलं आहे. त्यात अनेकदा खोट्या सह्या करण्याचे प्रकारही समोर येतात. मात्र उस्मानाबादेत एक असा खळबळजनक प्रकार घडला आहे  . 

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील एका सिलिंग जमिनीची विक्री (Property sale) करण्यासाठी बोगस व बनावट कागदपत्रे तयार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे केवळ अपर जिल्हाधिकारी यांचीच आदेशावर बनावट सही आहे असे नाही. तर संचिकेत टिपण्णीमध्ये इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासुद्धा बनावट सह्या असल्याचे कळते. यावरून अत्यंत नियोजनबद्ध रित्या हा प्रकार केला असून तो गंभीर आहे. सिलिंग जमीन विक्रीची परवानगी संचिकाच बनावट रित्या करण्यात केवळ एकट्या व्यक्तींचा यांचा हात आहे, की त्यात इतर कोण कोण गुंतले आहेत हे पोलीस तपासाशिवाय बाहेर येणे शक्य नाही.जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अश्या प्रकरणाबाबत ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.


 
Top