उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी आहे व आपल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बऱ्याच ठिकाणी फरश्याची पडझड झाली आहे तसेच ग्रील देखील निघाले आहे.

 या कडे नगरपालिका दुर्लक्ष करत आहे. यामुळे भारतीय मराठा महासंघ आक्रमक भूमिकेत आला आहे व 12 फेब्रुवारी पर्यंत जर ते काम झाले नाही तर  भारतीय मराठा महासंघ तीव्र आंदोलन करणारेल, असा   इशारा नगर परिषदचे मुख्याधिकारी येलगट्टे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष संकेत सुर्यवंशी, शिवराज्याभिषेक सोहळा समिती चे संस्थापक अध्यक्ष विष्णू इंगळे,उमेश राजेनिंबाळकर,तुषार निंबाळकर, सूनीलदत्ता फंड, खंडू राऊत,उदय गायकवाड, अभिजीत देशमुख,दीपक नागरसोगे,दत्ता सुरवसे हे उपस्थित होते.


 
Top