तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील  आपसिंगा येथे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून  ग्रामस्थांना  मोफत ई -श्रम कार्ड वाटप करुन  शिवजयंती  साजरी करण्यात आली.

 प्रारंभी  शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष गजानन बामणे, मुख्याध्यापक जाधव  यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच गावातील शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी अभिजीत लोके,  श्रीनाथ नखाते,  दिनेश गोरे, तुषार बोरगावे त्याचबरोबर ॲड.सुधीर सोनवणे, शंकर गिरी,सागर शिरसाट, शक्ति पांडगले, गणेश कसबे, विशाल क्षीरसागर, भास्कर कांबळे, आकाश कांबळे, शिवसेनेचे बालाजी पांचाळ व गावकरी बांधव उपस्थित होते.


 
Top