उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नुतन संचालक यांचा आळणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी गावत ढोलताशा व फटाक्याच्या जयघोषात मिरवणुक काढुन गावातील जागृत देवस्थान विठ्ठल व महादेव मंदिराचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.यानंतर माळी गल्ली येथिल महादेव मंदिरात सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी नुतन संचालक सलग तिसर्यावेळेस निवडुन आले  संजय बाबा देशमुख यांचा सत्कार सुनिल माळी यांनी केला.तसेच कॉग्रेस आय पार्टीचे नुतन संचाल महेबुब पटेल यांचा सत्कार विनोद वीर यांनी केला.कळंब मतदार संघाचे   बळवंत बप्पा तांबारे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य अनंत खोबरे यांनी केला.उस्मानाबाद मतदार संघाचे नुतन संचालक  नानासाहेब पाटील यांचा सत्कार डॉ जयसिंग वीर यांनी केला.कार्यक्रमाचे आयोजन रवि कोरे आळणीकर,श्रीपाल वीर,धनंजय वीर यांनी केले.नुतन संचालकांचा शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय बापु सस्ते,उस्मानाबाद तालुकाप्रमुख सतिश सोमाणी,युवा सेना तालुकाप्रमुख वैभव वीर,आण्णासाहेब तनमोर,विकास पाटील,राजेंद्र देशमुख,राजेंद्र नांदे,संतोष कदम,मुन्ना वीर,अंकुश कोरे,रामहरी मुंडे,हरीदास म्हेत्रे,सुरेश म्हेत्रे,लक्ष्मण तात्या माळी,राहुल वीर,प्रसाद वीर,विश्वजित वीर,सुरज माळी,समर्थ वीर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top