उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहरातील बहुजनांनी  कोशारी यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत  जोडे मारो आंदोलन करण्यात आले. 

   कोशारींच्या औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छ्त्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामीच्या अनुषंगाने वादग्रस्त विधान केले होते . त्याचा उस्मानाबादेत निषेध करण्यात आला. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनात नंदकुमार गवारे, शेखर घोडके, मृत्यूंजय बनसोडे, रणवीर इंगळे, अनिकेत पाटील यांच्यासह बहुजन समाजातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान संतृप्त बहुजन समाजातील नागरिकांनी कोशारीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

 
Top