उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्वराज्य निर्माते,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गोंधळी समाज बांधवांच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या नावाचा जयघोष करण्यात आला समस्त गोंधळी समाज हे दरवर्षी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात गोंधळी समाज बांधवांचा विशेष मान सन्मान केला जात असे,जयंती उत्सवात प्रामुख्याने दत्तात्रय बंडखोर,जनता बँकेचे संचालक आशिष मोदाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,प्रशांत पाटील,आतिष पाटील,पंकज पाटिल, नितीन धोंगडे, चर्मकार संघटनेचे महाराष्ट्र युवक अध्यक्ष नितिन शेरखाने,सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,नामदेव वाघमारे,नारायण साळुंके, गणेश एडके,माणिक साठे, पांडुरंग मते,दिपक पांढरे, सुनील ढगे मान्यवर उपस्थित होते जयंतीचे नियोजन सतिश लोंढे,लक्ष्मीकांत लोंढे,सुशांत लोंढे,तसेच प्रफुल्ल भिसे,मिनुनाथ कदम,बबलु राऊत, अमोल लोंढे,सुमित शिंदे,किरण मोरे,अन्य इतर मान्यवर उपस्थित होते.आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मीकांत लोंढे यांनी केले.


 
Top