वाशी / प्रतिनिधी-

 दहा वर्षापासून वाशी शहराच्या  थांबलेल्या विकासाला येणाऱ्या काळात गती देणार असून वाशी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी  सर्व नगरसेवक व भाजपा कार्यकर्ते कटिबद्ध आहोत. असे सूतोवाच उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांनी केले.  शहरातील  हायमास्ट विद्युतपोल कामचा लोकार्पण सोहळा   वर्तक चौक याठिकाणी पार पडला. 

  आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या निधीतून शहरात विद्युतीकरनाची कामे करण्यात आली आहेत. 27 हायमास्ट विद्यूत पोल  पथदिवे बसविण्यात आले असून 100 एलईडी पथदिवे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या कामाचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा विजयाबाई गायकवाड यांच्या हस्ते  पार पडला. यावेळी नगरसेवक स्मिता गायकवाड, वनमाला उंदरे, संजना चौधरी , श्रीकृष्ण उर्फ राजुभैया कवडे, विकास पवार, बळवंतराव कवडे, भागवत कवडे यांच्यासह सोसायटीचे चेरमन नानासाहेब कवडे, विनायक टेकाळे, बापूराव उंदरे, शिवाजी उंदरे, बबन कवडे, प्रशांत गायकवाड, अहमद काझी,सचिन कवडे यांच्यासह नागरिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top