परंडा / प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व सध्या याच महाविद्यालयामध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत असलेले प्रा रोहित भाऊसाहेब दिवाने त्यांनी यूजीसी नेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

यूजीसीने डिसेंबर 2020 21 मध्ये नेट परीक्षेचे आयोजन केले होते. त्याचा निकाल नुकताच लागला. त्यामध्ये रोहित भाऊसाहेब दिवाने हे उत्तीर्ण झाले आहेत.यापूर्वीही डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठातील पेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांनी घेतलेली सेट परीक्षेतही त्यांनी यश संपादन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर ,अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे, महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा डॉ शहाजी चंदनशिवे ,आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने ,कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब दिवाने यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


 
Top