तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील मौजे दहिवडी येथील चिमुकल्याने शिवजयंती पार्श्वभूमीवर गावात आकर्षक असे मातीचे किल्ले तयार केले असुन हे किल्ले शिवप्रैमीचे लक्ष वेधुन घेत आहेत.  मायभूमी फाऊंडेशनच्या वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देत चिमुकल्यांनसाठी हस्ताक्षर व गडकिल्ले स्पर्धा घेवुन   िवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

प्रारंभी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन काटीचे  जि.प.सदस्य राजकुमार पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्याख्याते अर्जुन अमृतराव,संजय गायकवाड, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष दादा चव्हाण,उपाध्यक्ष समाधान पवार,ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब गाटे यांची उपस्थिती होती.  इयत्ता  १ ली ते १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या एकूण ९६ विद्यार्थ्यांनी यांनी यात सहभाग घेतला.

यात  जंजिरा,रायगड,शिवनेरी,पन्हाळगड, नळदुर्ग किल्ल्यासह  इतर किल्ले प्रतिकृती साकारल्या होत्या. सदरील स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण गाटे यानीं तर उपस्थीतांचे अतुल गाटे यानीं आभार व्यक्त मानले.

 
Top