उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयातील चार तालुक्यात मुलीचे प्रमाण कमी झाले आहे. पीसीपीएनडीटी कायद्या नुसार जिल्हयात ९० सोनोग्राफी मशिन आहेत. तर ५३ गर्भपात सेंटर चालू स्थितीमध्ये आहेत. परंतू या ठिकाणी व्यंगात्मक गर्भाची तपासणी केली जाते. पीसीपीएनटीडी अंतर्गत राज्यपर्यवेक्षक मंडळाच्या अशासकीय सदस्या डाॅ.अशा मिरगे यांनी उस्मानाबाद जिल्हयात बाजूच्या जिल्हयातील व्हॉन येऊन गर्भलिंग िनदान करते व त्यामुळे जिल्हयातील 4   तालुक्यातील मुलींचा जन्मदर कमी झाला आहे. या व्हॅनची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येईल, असे डॉ.मिरगे यंानी पत्रकार परिषदेत सांगितले.

पीसीपीएनटीडी समितीच्या सदस्या डॉ.आशा मिरगे, वैशालीताई मोटे, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हाश्ल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, डॉ.कुलदिप मिटकरी, डॉ.खुने यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार दि. १५ फेबुृवारी रोजी जिल्हयातील कमी होत असलेल्या मुलींच्या जन्मदराबाबत पत्रकार परिषद घेतली. पुढे बोलताना डॉ.मिरगे यांनी सोनोग्राफी व गर्भपात सेंटर सुरू करण्यासाठी नियम कडक केले आहेत. त्याचे रजिस्टेशन करने आवश्यक आहे, असे असले तरी एकंदर महाराष्ट्रातील हजार मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर कमी होत आहे. उस्मानाबाद जिल्हयात भूम तालुक्यात हजार मुलांच्या मागे, डिसेंबर २०२१ पर्यंत मुलींचा जन्मदर ८१२ आहे तर कळंबमध्ये हा मुलींचा जन्मदर   ८३१ आहे. तर उस्मानाबाद तालुक्यात मुलींचा जन्मदर ९०५ आहे. तुळजापूर तालुक्यात मुलींचा जन्म दर ९१२ आहे. 

या संदर्भात माहिती घेतली असता बाजूच्या जिल्हयातील व्हॉन या तालुक्यात येत असून ह्या व्हॉनमध्ये गर्भलिंग निदान केले जात आहे. त्यानंतर गर्भपात ही बाहेरच्या जिल्हयात केले जात असल्याची माहिती डॉ.मिरगे यांनी दिली. या संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांना माहिती दिली असून महसूल विभाग, पोलिस विभाग, आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग या ही माध्यमातून या व्हॉनचा तपास केला जाई,असे ही त्यांनी संागितले. ज्या तालुक्यात किंवा गावात मुलींचा जन्मदर वाढेल त्या गावांना विशेष पुरस्कार देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  


 
Top