परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा येथील रेवनी भीमनगर मंडई पेठ येथे भीम प्रतिष्ठानच्या वतीने माता रमाई  यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भीमा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक रत्नकांत (पापा ) शिंदे यांनी या जयंती उत्सवाचे आयोजन आयोजन केले होते.  

 यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.माता रमाई यांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील विद्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रत्नकांत शिंदे ,ज्येष्ठ समाजसेवक तानाजी , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव मोहनदादा बनसोडे , अर्जून सोनवणे ,भाग्यवंत शिंदे सचिन चौतमाल , प्रणित कांबळे, कानिफ बनसोडे यांच्यासह भिम नगर मधील सर्व बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ समाजसेवक तानाजी शिंदे यांनी माता रमाई यांच्या जयंती निमित्त उपस्थित बौद्ध अनुयायांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक  भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक रत्नकांत शिंदे यांनी केले प्रणित कांबळे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

 
Top