उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद शहरातील घर लुटल्याची खळबळजनक घटना रात्रीच्या सुमारास घडली. चार जणांनी घरात प्रवेश करून लाकडी दांडक्याने घरातील कर्त्या पुरुषाला बेशुद्ध करून आणि माय लेकींना भीती घालून घर लुटले. घर लुटल्यानंतर चोरट्यांनी जाताना घराची बाहेरून कडी लावून पळ काढला. पोस्ट कॉलनीत ही घटना घडल्याने संपूर्ण उस्मानाबाद शहरात खळबळ उडाली आहे.या घटनेसंदर्भात महिलेने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, पोस्ट कॉलनी, गजानन महाराज मंदिराजवळ ता.जि. उस्मानाबाद पती, मुलीसह राहते. पती हे सरकारी दवाखाना उस्मानाबाद येथे नोकरीस आहेत. 

दि.06 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री जेवणखाण करून 11:30 वा च्या सुमारास दोन्ही मुली बेडरूम मध्ये व महिला व पती हॉलमध्ये झोपी गेले. रात्री 03:00 वाजेच्या सुमारास घराचा दरवाजाचा अचानक आवाज येवून दरवाजामधून एका मागे एक असे चार अनोळखी लोक घरात घुसलेत्यामुळे महिला व तिचा पती जागे झाले. चोघांपैकी एकाने महिलेच्या पतीच्या डावे हातावर, तोंडावर लाकडी दांडक्याने जोराने मारले. त्यामुळे मोठ्याने ओरडून ते जागीच बेशुध्द झाले. त्यामुळे महिला घाबरून मुलींकडे धावत गेली. त्यावेळी आवाजाने मुलीसुध्दा उठल्या होत्या. त्या अनोळखी चार लोकांपैकी तिघांच्या पन्टीला कोयते लटकवलेले दिसले. महिलेच्या पतीला दांडक्याने मारणा-या व्यक्तीने लाकडी दांडग्याचा धाक दाखवून महिला व मुलींना मराठीमध्ये म्हणाला की, आवाज करू नका, नाहीतर तुझ्या मुलीवर रेप करेन अशी धमकी दिल्याने महिला व मुली बेडरूमच्या बाहेर जागेवर घाबरून उभ्या राहिल्या.त्यावेळी त्यांच्यातील एक जण पतीजवळ लाकडी दांडका घेवून थांबला. दुसरा जण मायलेकींसमोर लाकडी दांडका हातात घेवून थांबला. उरलेले दोन जण घराच्या आतील बाजुस असलेल्या कपाटाचे व सामानाची तपासणी करू लागले. कपाटातील व इतर ठिकाणची तपासणी करून तेथील ऐवज घेवून ते दोघे बाहेर आले. त्यांच्यातील एक जण म्हणाला की, यांच्या घरात काही भेटत नाही चला येथून असे म्हणाल्यावर मायलेकींसमोर लाकडी दांडका घेवून थांबलेल्या चोरट्याने दरडावून तुमच्या अंगावरील दागिने काढून दया नाहीतर तुम्हांला मारतो असे म्हणाल्याने महिलेने गळयातील 05 ग्रम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, कानातील 03 ग्रम वजनाचे सोन्याचे  फुले, सोन्याची अंगठी तसेच मुलींचे दागिने भीतीपोटी काढून त्याच्या हातात दिले.दागिने दिल्यानंतर ते सर्वजण घरातून निघून गेले. ते गेल्यावर मायलेकींनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी बाहेरून दरवाजा लावल्याने दरवाजा उघडला नाही. नंतर बेशुद्ध पडलेल्या पतीला उठवण्याचा प्रयत्न महिलेने केला. पण ते बेशुध्द असल्याने उठले नाहीत. थोडयावेळात घराच्या बाहेर पोलीस जीपच्या सायरनचा आवाज आल्याने मायलेकींनी मोठमोठयाने आरडाओरड केली. तेव्हा  शेजारी आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर पतीला दवाखान्यात नेवून दाखल केले. दरम्यान, 26,000 रुपयांचे दागिने व रोख 4 हजार रुपये चोरीस गेले. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून उस्मानाबाद शहरातील आनंदनगर पोलिस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून चौघावर गुन्हा दाखल झाला आहे.

 

 
Top