उस्मानाबाद(प्रतिनिधी) 

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, श्रीमानयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून उस्मानाबाद शहरातील शिवकन्या गायत्री गाडेकर यांच्या शिवचरित्र रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन खासदार ओमप्रकाश  राजेनिंबाळकर,आमदार कैलास पाटील यांच्या समवेत अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात.  अतिशय सुबक आणि आकर्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवन चरित्रावर रांगोळी काढून कु.गायत्री गाडेकर यांनी उपस्थित शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कलेचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

 याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, खामकर मामा, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे विष्णू इंगळे, सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे आदींसह शिवभक्त उपस्थित होते.


 
Top