उस्मानाबाद(प्रतिनिधी) 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपली माणसं सामाजिक बहुउद्देशीय संस्था व टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवाजी चौकात मोफत नाश्त्याची सोय करण्यात आली. 

 यावेळी आमदार राणाजगजितसिह पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अर्चना पाटील ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख ,राजसिह निंबाळकर ,आपली माणसं संस्थेचे अध्यक्ष खंडू राऊत , टुव्हीलर मेकानिकल असोसिएन अध्यक्ष बाबासाहेब साळुंके ,धर्मराज मगर  मोहन झोरी ,संकेत सूर्यवंशी ,अमोल देशमुख ,किरण राऊत, जयवंत ओमाणे, केदार हिबारे,वैभव कुलकर्णी, पवन सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या भोजनास स्थळी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील , माजी नगराध्यक्ष नंदू भैया राजेनिंबाळकर यांनी  भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

 
Top